जळगाव: जैन फूडपार्क, एनर्जी पार्क मध्ये मतदान जनजागृती | पुढारी

जळगाव: जैन फूडपार्क, एनर्जी पार्क मध्ये मतदान जनजागृती

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जळगाव जिल्ह्यात शासकीय यंत्रणेमार्फत आणि विविध संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. त्याचप्रमाणे जैन इरीगेशन सिस्टिम लि. च्या जैन फूडपार्क व एनर्जी पार्क मध्ये मतदान जनजागृती करण्यात आली.

गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी आणि जळगाव जिल्हा लोकसभा २०२४ चे अधिकृत आयकॉन मदन रामनाथ लाठी आणि जळगाव मतदान केंद्रस्तरीय अधिकारी गिरीश रमनलाल भावसार (बीएलओ) उपस्थित होते. त्यानंतर जळगाव जिल्हा लोकसभा निवडणूक 2024चे आयकॉन मदन लाठी यांनी मतदानाचे महत्त्व थोडक्यात पटवून दिले. सोमवार (दि.१३) रोजी पहिल्या टप्प्यात जास्तीत जास्त मतदान करुन सोबत घरातील सदस्य, आजुबाजुचे शेजारी व नातेवाईकांना विनंती करून, जसे आपण उत्सव साजरे करतो त्याप्रमाणे सोमवार (दि.१३) रोजी हा उत्सव मोठ्या अभिमानाने साजरा करावा अशी विनंती करून मतदानाची शपथ देण्यात आली.
बीएलओ गिरीश भावसार यांनी जिल्हाधिकारी यांचे मतदानाविषयी लोकशाहीच्या उत्सव पत्राचे वाचन केले.
त्यानंतर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान प्रक्रियेत झालेल्या बदलाची माहिती दिली, मतदार यादीत नाव शोधणे, मोबाईलवरील मेसेज व ॲपचा वापर करण्या संबंधी सुविधा समजावून सांगितली आणि उपस्थितांचे शंका निरसन केले.

Back to top button