अदानींच्या शेल कंपन्यांतील 20 हजार कोटी कोणाचे? : राहुल गांधी | पुढारी

अदानींच्या शेल कंपन्यांतील 20 हजार कोटी कोणाचे? : राहुल गांधी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  अदानींच्या शेल कंपन्यांतील 20 हजार कोटी रुपयांच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. हे पैसे नेमके कोणाचे आहेत, याचा खुलासा केंद्र सरकारने करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीच्या वेळी त्यांनी भाजपच्या आरोपांना उत्तर दिले. राहुल आणि त्यांचा काँग्रेस पक्ष न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप भाजपने सोमवारी केला होता. त्या आरोपाला उत्तर देताना राहुल म्हणाले, अदानींच्या शेल कंपन्यांतील 20 हजार कोटी रुपये कोणाच्या मालकीचे आहेत याचे उत्तर भाजप आणि केंद्र सरकारने आधी द्यावे. त्यानंतरच त्यांनी माझ्यावर आरोप करावेत.

दरम्यान, राहुल यांनी लोकशाही वाचविण्याच्या संदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सत्य हेच माझे एकमेव शस्त्र आहे. त्या बळावरच माझा संघर्ष सुरू आहे.

Back to top button