भयंकर…कर्नाटकमध्‍ये भटक्‍या कुत्र्याने रुग्णालयातून अर्भक पळवले आणि पुढे… | पुढारी

भयंकर...कर्नाटकमध्‍ये भटक्‍या कुत्र्याने रुग्णालयातून अर्भक पळवले आणि पुढे...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. भटक्‍या कुत्र्याने रुग्णालयात घुसून प्रसूती विभागातील नवजात अर्भकाला ओरबाडून बाहेर काढले. विशेष म्‍हणजे ही भयंकर घटना घडत असताना कोणाचीही भटक्‍या कुत्र्यावर नजर पडली नाही. कुत्रे अर्भकाला रुग्‍णालय परिसरात बाहेर पळून घेवून जाताना सुरक्षा रक्षकांनी पाहिले. त्यांनी कुत्र्याच्या तावडीतून अर्भकाची सुटका केली;पण तोपर्यंत उशीर झाला होता. पुरुष जातीच्‍या अर्भकाचा मृत्यू झाला होता.

हदय पिळवटून टाकणार्‍या या प्रकाराबाबत शिवमोग्गा जिल्‍हा रुग्‍णालयातील सुरक्षा रक्षकांनी सांगितले की, शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भटक्‍या कुत्र्याच्या तोंडात नवजात अर्भक मूल दिसले, रुग्णालयातील प्रसूती वॉर्डात कुत्रा पळत होता. त्‍यांनी त्‍याचा पाठलाग केला. कुत्र्याच्या तावडीतून अर्भकाची सुटका करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button