साठा खुला करण्याच्या घोषणेनंतर गव्हाचे दर दहा टक्क्यांनी घसरले | पुढारी

साठा खुला करण्याच्या घोषणेनंतर गव्हाचे दर दहा टक्क्यांनी घसरले

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  येत्या सहा आठवड्यांत 30 लाख मेट्रिक टन गव्हाचा साठा खुल्या बाजारात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर गव्हाचे दर उतरायला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांत गव्हाचे दर 10 टक्क्यांनी कमी झाले आहेत.

राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश अणि पंजाब येथील बाजार समित्यांत गव्हाचे दर 2950 रु. प्रति क्विंटलवरून घटले असून त्यात 200 रुपयांची घट झाली आहे. सध्या बाजार समित्यांत दर कमी व्हायला प्रारंभ झाला असून फेब्रुवारीच्या मध्यापासून गहू आणि आट्याच्या किरकोळ विक्रीच्या दरातही ही घट दिसेल, असे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.

Back to top button