UWIN app : ‘यु विन’ मुळे माता आणि शिशुंच्या लसीकरणाची प्रक्रिया सुलभ, जन्म प्रमाणपत्र देखील मिळणार | पुढारी

UWIN app : 'यु विन' मुळे माता आणि शिशुंच्या लसीकरणाची प्रक्रिया सुलभ, जन्म प्रमाणपत्र देखील मिळणार

पुढारी ऑनलाइन डेस्क : UWIN app : कोरोना महामारी दरम्यान लसीकरणाची प्रक्रिया सुलभरित्या पार पाडण्यासाठी सरकारने को विन हे अॅप लाँच केले होते. कोविनच्याच धर्तीवर आता केंद्र सरकार अन्य आजारांवरील लसीकरणासाठी ‘युविन’ हे अॅप लाँच केले आहे. विशेषकरून हे अॅप माता आणि शिशूंच्या देखभालीसाठी वेळोवेळी देण्यात येणा-या लसींसाठी 11 जानेवारीला लाँच करण्यात आले आहे.

कोरोना लसीकरणादरम्यान कोविन अॅपमुळे आपल्या जवळचे केंद्र शोधणे, अपॉइंटमेंट बुक करणे, सर्टिफिकेट कधीही कुठेही डाउनलोड करणे इत्यादी गोष्टी अगदीच सुलभ झाल्या. त्याच प्रकारे अन्य आजारांवरील लसीकरणासाठी विशेष म्हणजे माता आणि शिशुंच्या देखभालीसाठी वेळोवेळी देण्यात येणा-या लसींचा रेकॉर्ड ठेवणे, पुढील लसीकरणाची तारीख सांगणे, डॉक्टरांकडे नोंदणी करणे इत्यादी गोष्टी या युविन अॅप UWIN app द्वारे अगदी सहजरित्या पार पडतील.

UWIN app : गर्भधारणेनंतर नोंदणीनंतरचा सर्व रेकॉर्ड ठेवता येणार

आतापर्यंत गर्भधारणेपासून ते शिशू जन्माला येईपर्यंत आणि नवजात शिशूंना दिल्या जाणा-या वेगवेगळ्या लसी द्याव्या लागतात. त्यासाठी विशिष्ट लसीकरण कार्ड देण्यात येते. मात्र, या सर्व लसीकरणा दरम्यान अनेक वेळा ग्रामीण किंवा छोट्या वाडी वस्ती येथील नागरिक हे कार्ड हरवून टाकतात. तसेच हा रेकॉर्ड कागदोपत्री ठेवण्याची प्रक्रिया अगदीच किचकट असते. त्यामुळे यु विन अॅपमुळे माता आणि शिशूंच्या लसीकरणाची प्रक्रिया सुलभ होणार आहे.

सध्या जवळपास सर्वच घरात स्मार्टफोन उपलब्ध आहेत. त्यामुळे अॅपवरून डॉक्टरांकडे लसीकरणासाठी नोंदणी करणे, पुढील लसीकरणाची तारीख, या सारख्या गोष्टी गर्भवती महिला आणि तिच्या कुटुंबीयांपर्यंत सहजरित्या पोहोचवली जाईल.

UWIN app : 65 जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट

सध्या हा युविनचा हा प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्ट म्हणून 11 जानेवारीला 65 जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारकडून लाँच करण्यात आला आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील दोन जिल्ह्यांमध्ये हा प्रोजेक्ट प्रायोगिक तत्वावर लाँच करण्यात आला आहे. याच्या यशस्वीतेनंतर तो देशभरात लाँच करण्यात येईल.

UWIN app आयुष्मान भारतच्या ओळख पत्राशी जोडले जाणार

यु विन हे अॅप आयुष्मान भारत स्वास्थ खात्याच्या ओळखपत्राशी देखील जोडले जाईल. त्यामुळे सर्व राज्य आणि जिल्हा रुग्णालयात तसेच वैद्यकीय महाविद्यालयात याचे रेकॉर्ड उपलब्ध राहण्यास मदत होईल. यामुळे कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे लसीकरण करता येईल.

UWIN app : जन्म प्रमाणपत्र देखील मिळणार

UWin app वर मातेच्या गर्भधारणेपासून ते शिशूच्या जन्मानंतरच्या लसीकरणाची नोंद यामध्ये असल्यामुळे याच अॅपवरून जन्म प्रमाणपत्र देखील अगदी सहज रित्या कधीही डाऊनलोड करता येईल. त्यामुळे नंतरच्या काळात जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात जाण्याची गरज उरणार नाही. हा याचा मोठा फायदा होणार आहे.

प्रमाणपत्र डिजीलॉकरमध्ये ठेवू शकता

हे प्रमाणपत्र तुम्ही डिजीलॉकर मध्ये देखील सांभाळून ठेवू शकता. त्यामुळे भविष्यात केव्हाही गरज पडल्यास डीजी लॉकरच्या माध्यमातून हे प्रमाणपत्र तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकते.

हे ही वाचा:

बॉयकॉट बॉलीवुड ट्रेडवर करिना म्हणाली; आनंद कसा अनुभवणार…

Layoffs in US : मंदीच्‍या झळा..! नोकरी गमावलेल्‍या अमेरिकेतील हजारो भारतीयांवर टांगती तलवार

Back to top button