Layoffs in US : मंदीच्‍या झळा..! नोकरी गमावलेल्‍या अमेरिकेतील हजारो भारतीयांवर टांगती तलवार | पुढारी

Layoffs in US : मंदीच्‍या झळा..! नोकरी गमावलेल्‍या अमेरिकेतील हजारो भारतीयांवर टांगती तलवार

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेमध्ये मंदीची लाट पसरल्यामुळे हजारो आयटी कर्मचाऱ्यांना टाळेबंदीचा (Layoffs in US) सामना करावा लागत आहे.  गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि ॲमेझॉन अशा दिग्गज कंपन्यामधील भारतीय कर्मचाऱ्यांनाही आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. हजारो भारतीयांनी नोकरी गमवल्यानंतर आता H-1B L1 वर्क व्हिसा मुदतीमध्ये नवीन रोजगार शोधण्यासोबतच येथे राहण्यासाठीही संघर्ष करत आहेत. त्यामुळे दुसऱी नोकरी मिळेपर्यंतयेथील भारतीय कर्मचाऱ्यांवर राहण्याची टांगती तलवार कायम आहे.

‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने दिलेल्‍या वृत्तानुसार, गेल्यावर्षी नोव्हेंबरपासून सुमारे दोन लाख आयटी कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे.  (Layoffs in US) यामध्‍ये  गुगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक आणि ॲमेझॉन सारख्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची विक्रमी संख्या आहे. यामध्‍ये  ३० ते ४० टक्के भारतीय आयटी कर्मचारी हे H-1B आणि L1 व्हिसा असणारे आहेत. नोकरी गमवल्यानंतर आता अशा कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे.

 Layoffs in US : पुन्हा दुसरी नोकरी मिळवण्‍याचे आव्‍हान

सध्या अमेरिकेत मंदीचे सावट आहे. याचा परिणामा आयटी कंपनींवर झाला आहे. या कंपन्‍यांनी मागील काही महिन्‍यांपासून मोठ्या प्रमाणात टाळेबंदी मोहिम (Layoffs in US) सुरू केली आहे. अशा स्थितीत अगदी अल्प कालावधीत अमेरिकेत पुन्हा दुसरी नोकरी मिळवणे हे आव्‍हानच असणारा आहे. नोकरी न मिळाल्यास हजारो भारतीयांना मायदेशी परतावे लागणार आहे.

६० दिवसांची अट, अन्‍यथा मायदेशी परतणे हाच पर्याय

H-1B L1 व्हिसा असणाऱ्यांना काही महिन्यांसाठी वास्तव्य करण्याची परवानगी मिळते; पण काही महिन्यांच्या कालावधीत नवीन नोकरी शोधण्याबरोबरच अमेरिकेत राहण्याचे काही पर्याय असू शकतात का? याचा शोध येथील नोकरी गमावलेले आयटी कर्मचारी घेत आहेत. परदेशातील नोकरी गमवल्यानंतर परदेशी कामाच्या व्हिसाचे नियम आणि स्थिती देखील बदलते. H-1B व्हिसावर असलेल्यांसाठी परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे. त्यांना 60 दिवसांच्या आत नवीन नोकरी शोधावी लागणार आहे. नोकरी मिळाली नाही तर  मायदेशात परतणे, हाच एकमेव पर्याय त्‍यांच्‍यासमोर आहे.

हेही वाचा:

Back to top button