Jallikattu event : ‘जल्लीकट्टू’वेळी बैलाच्‍या हल्‍ल्‍यात शाळकरी मुलाचा मृत्‍यू | पुढारी

Jallikattu event : 'जल्लीकट्टू'वेळी बैलाच्‍या हल्‍ल्‍यात शाळकरी मुलाचा मृत्‍यू

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तामिळनाडूमधील ‘जल्लीकट्टू’ पारंपरिक खेळ पाहण्‍यासाठी केलेल्‍या शाळकरी मुलाचा बैलाच्‍या हल्‍ल्‍यात मृत्‍यू झाला. यावर्षी जल्लीकट्टू खेळावेळी झालेला हा चौथा मृत्‍यू ठरला आहे. ( Jallikattu event )

तामिळनाडूमधील धर्मपुरी येथे जल्लीकट्टू खेळाचे आयोजन करण्‍यात आले होते. १४ वर्षीय शाळकरी मुलगा गोकुळ हा आपल्‍या नातेवाईकांसह खेळ पाहण्‍यासाठी गेला होता. खेळ सुरु असताना बैल गर्दीत घुसला. त्‍याने गोकुळवर हल्‍ला केला. यामध्‍ये तो गंभीर जखमी झाला. त्‍याला तत्‍काळ धर्मपुरीच्‍या शासकीय रुग्‍णालयात नेण्‍यात आले. येथे उपचारापूर्वीच गोकुळचा मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्‍टारांनी जाहीर केले. या प्रकरणी धर्मपुरी पोलीस ठाण्‍यात नोंद झाली आहे. गोकुळ कसा जखमी झाला, याचा शोध घेण्‍यासाठी सीसीटीव्‍ही फुटेज तपासण्‍यात येत आहे, अशी माहिती स्‍थानिक पोलिसांनी दिली.

Jallikattu event : तामिळनाडूतील पारंपरिक खेळ जल्लीकट्टू

तामिळनाडूमध्‍ये जानेवारी महिन्‍यात पोंगण सणादरम्‍यान जल्लीकट्टू हा पारंपरिक खेळ खेळला जातो. या खेळात वळूंना वश करण्‍याचा प्रयत्‍न केला जातो. राज्‍यात या खेळाला २००० वर्षांची परंपरा आहे. सल्‍ली कासू म्‍हणजे नाणी आणि कट्टू म्‍हणजे नाण्‍यांचा सग्रह. या पारंपरिक खेळात बैलाच्‍या शिंगांना एक पिशवी बांधली जाते. जेव्‍हा या स्‍पर्धेत बैलाच्‍या मागे तरुण धावतात. बैलाच्‍या शिंगांना बांधलेली पिशवी काढून घेण्‍याचा प्रयत्‍न केला जातो. यातूनच विजेता ठरतो. या खेळात जेलीकट या जातीच्‍या वळूंचाच वापर केला जातो. त्‍यामुळे या खेळाला जलीकट्टू हे नाव पडले.

हेही वाचा : 

 

 

Back to top button