Shraddha Murder Case : श्रद्धा वालकर खून प्रकरणी आरोपी आफताबवर '३००० पानी' चार्जशीट! | पुढारी

Shraddha Murder Case : श्रद्धा वालकर खून प्रकरणी आरोपी आफताबवर '३००० पानी' चार्जशीट!

पुढारी ऑनलाईन : गेल्या काही महिन्यांपासून देशभरात गाजत असलेल्या श्रद्धा वालकर खून प्रकरणी नवी माहिती समोर येत आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ‘३००० पानी चार्जशीट’चा ड्राफ्ट तयार केला आहे. तो लवकरच न्यायालयात दाखल होऊन आरोपी आफताबवर आरोपपत्र दाखल होईल,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

श्रद्धा वालकर खून प्रकरणी कायदेतज्ज्ञ या खटल्याच्या आरोपपत्राचा मसुदा तपासत आहेत. प्रजासत्ताक दिनानंतर जानेवारी अखेपर्यंत आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे. ३००० हून अधिक पानांच्या आरोपपत्राच्या मसुद्यात दिल्ली पोलिसांनी १०० साक्षीदारांच्या जबाबाव्यतिरिक्त फॉरेन्सिक आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा केले आहेत.

वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची तिचा लिव्ह इनमध्ये राहणारा मित्र आफताब अमीन पूनावाला (२८) याने दिल्लीत राहत्या घरी श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. ते फ्रिजमध्ये ठेवून तब्बल तीन आठवड्यात टप्प्याटप्याने त्याने मृतदेहाचे तुकडे दिल्लीतील जंगलात टाकत, त्याची विल्हेवाट लावली. या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून संबंधित तपास सुरु आहे. या प्रकरणी अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामुळे या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याच्यावर चार्जशीट दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.

हेही वाचा:

Back to top button