स्टेट बँकेचे कर्ज महागले  | पुढारी

स्टेट बँकेचे कर्ज महागले 

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडक कालावधीसाठीच्या कर्जावरील व्याज दर १० बेस पॉईंटस्ने वाढविले आहेत. बँकेच्या वेबसाईटनुसार हे नवीन व्याज दर १५ जानेवारी २०२३ पासून लागू होतील. या नवीनतम दरांमुळे कर्जदारांच्या ईएमआयमध्ये किंचित वाढ होईल.

स्टेट बँकेने एका वर्षाच्या कालावधीसाठीचा कर्ज दर ७.७ टक्क्यांवरून ७.८ टक्के केला आहे. एका दिवसासाठीचा कर्ज व्याज दर ७.८५ टक्के राहील. एका महिन्यासाठी आणि तीन महिन्यांच्या कालावधीसाठी, व्याज दर ८ टक्के झाला आहे. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ८.३० टक्के, दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी आणि तीन वर्षांसाठी अनुक्रमे ८.५० टक्के आणि ८.६० टक्के असा व्याज दर असणार आहे.

Back to top button