चक्क बर्फाच्छादित ट्रॅकवरूनही ट्रेन सुसाट (VIDEO) | पुढारी

चक्क बर्फाच्छादित ट्रॅकवरूनही ट्रेन सुसाट (VIDEO)

श्रीनगर; वृत्तसंस्था :  सध्या सोशल मीडियावर बर्फाच्छादित रेल्वे रुळावरून एक ट्रेन सहजरीत्या मार्गक्रमण करतानाचा व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. मोठ्या प्रमाणात तो पसंदही केला जात आहे. काश्मीरला ‘भारताचे नंदनवन’ असे म्हटले जाते. रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सध्या येथील एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओत दूरवर सर्वत्र बर्फच बर्फ दिसून येत आहे. येथीलसध्या सर्वत्र थंडीची लाट सुरू आहे. उत्तर भारतातील काही राज्ये गारेगार झाली आहेत. काश्मीर खोऱ्यामध्ये तर सर्वत्र बर्फवृष्टी होत असल्याने येथील वातावरण आल्हाददायक बनले आहे. सध्या निसर्गाचा अद्भुत आविष्कार पर्यटकांना येथे पाहावयास मिळत आहे. येथील एक व्हिडीओ रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. ‘जम्मू-काश्मीर येथील बनिहाल ते बडगामपर्यंत बर्फाच्छादित खोऱ्यातून जात असलेल्या ट्रेनचे मनोहारी दृश्य’, असे या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. या ३५ सेकंदांच्या व्हिडीओला आतापर्यंत १४०.३ के व्ह्यूज मिळाले आहेत. तर ५,००० पेक्षा अधिक जणांनी यास लाईक केले आहे. १,०००  पेक्षा अधिक जणांनी हा व्हिडीओ रिट्रिट केला आहे.

Back to top button