Sexual Harassment : दिल्लीतील पाकिस्तानच्या दुतावासात भारतीय महिलेचा लैंगिक छळ | पुढारी

Sexual Harassment : दिल्लीतील पाकिस्तानच्या दुतावासात भारतीय महिलेचा लैंगिक छळ

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानला भेट देण्याच्या उद्देशाने व्हिसासाठी दिल्लीतील पाकिस्तानच्या दुतावासात अर्ज केल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांकडून असभ्य वर्तन आणि लैगिंक छळ केल्याचा गंभीर आरोप एका महिला प्राध्यापकाने केला आहे. ही घटना मार्च २०२२ मधील असून पीडित महिलेने याबाबतची तक्रार परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे केली आहे. (Sexual Harassment)

एका वरिष्ठ प्राध्यापक आणि विद्यापीठातील एका विभागाच्या प्रमुख असणाऱ्या महिला प्राध्यापकाने दिल्लीतील पाकिस्तानच्या दुतावासात व्हिसासाठी अपॉइंटमेंट घेतली होती. तेव्हा त्या महिलेने दुतावासात जावून पाकिस्तानला जाण्याचे कारण सांगितले. दुतावासातील अधिकाऱ्याने लाहोरला भेट देण्याचे प्रयोजन विचारले असता महिला प्राध्यहापकाने त्या अधिकाऱ्याला सांगितले की, “मला लाहोरला जाऊन स्मारकांचे फोटो काढायचे आहेत आणि त्यावर लिहायचे आहे, तसेच मला व्याख्यानासाठी आमंत्रित केलेल्या विद्यापीठालाही भेट द्यायचे आहे. (Sexual Harassment)

व्हिसा संदर्भात मुलाखत पार पडल्यानंतर पीडित महिला तेथून निघाणार होत्या तेव्हा दुसरा अधिकारी आला आणि तो वैयक्तीक प्रश्न विचारु लागला. यामुळे पीडित महिला अस्वस्थ झाली. पीडित महिलेने सांगितले त्या अधिकाऱ्याने मला विचारले की तू लग्न का केले नाही, तू लग्नाशिवाय कशी जगते? तू तुझ्या लैगिंक इच्छेचे काय करतेस? पीडित महिलेने सांगितले की, मी त्या अधिकाऱ्याशी बोलताना विषय बदलण्याचा प्रयत्न केला पण, तो पाकिस्तानी अधिकारी मला तेच तेच प्रश्न विचारुन त्रास देत होता. (Sexual Harassment)

पराराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे केली तक्रार

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडे केलेल्या तक्रारीत पीडित महिलेने संबंधित प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. या प्रकरणी पाकिस्तानच्या दुतावासातील संबंधित कर्मचाऱ्या सोबतचे व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉटही परराष्ट्र मंत्र्यांना पाठवले आहेत. तक्रारीमध्ये पीडित महिलेने आरोप केला की तिला भारत सरकारच्या विरोधात लिहिण्यास सांगितले गेले आणि तिला चांगला मोबदला देऊ करण्यात आला, जो तिने स्पष्टपणे नाकारला. महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, नंतर संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की माझा व्हिसा मंजूर होऊ शकत नाही आणि तूम्ही पुन्हा प्रयत्न करा तेव्हा आम्ही पुन्हा तुमची पडताळणी करु.

अधिक वाचा :

Back to top button