नवे कोरोना रुग्‍ण ४२ हजार ७६६ , १ हजार २०६ जणांचा मृत्‍यू | पुढारी

नवे कोरोना रुग्‍ण ४२ हजार ७६६ , १ हजार २०६ जणांचा मृत्‍यू

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन: कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र संसर्गामध्‍ये चढ-उतार कायम आहे. मागील २४ तासांमध्‍ये संसर्ग झालेल्‍या १ हजार २०६ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला. यामुळे पुन्‍हा एकदा चिंता वाढली आहे. नवे कोरोना रुग्‍ण ४२ हजार ७६६ आढळले. ४५ हजार २५४ रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्‍याची माहिती आरोग्‍य मंत्रालयाच्‍या सूत्रांनी दिली.

मागील काही दिवसांमध्‍ये नवे काेराेना रुग्‍ण संख्‍या कमी झाली आहे. कोरोना संसर्गाची  दुसरी लाट ओसरत आहे. मागील काही दिवसांमध्‍ये रुग्‍ण मृत्‍यूचा आकडाही कमी झाला आहे. नऊ दिवसानंतर देशातील कोरोनामुळे झालेली मृत्‍यू संख्‍या एक हजारपेक्षा अधिक नोंदवली नेली आहे. यापूर्वी ३० जून रोजी १ ००२ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला होता. गुरुवारी ९११ जणांचा मृत्‍यू झाला होता. मात्र यामध्‍ये पुन्‍हा वाढ झाल्‍याने चिंता व्‍यक्‍त होत आहे.

देशात आतापर्यंत ३ कोटी ७ लाख ९५ हजार ७१६ रुग्‍ण आढळले आहेत. यातील २ कोटी ९९ लाख ३३ हजार ५३८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्‍या देशात ४ लाख ५५ हजार ३३ सक्रीय रुग्‍ण आहेत. आतापर्यंत ४ लाख ७ हजार १४५ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे.

संसर्ग दर कमी असणार्‍या राज्‍यांमध्‍ये आता अनलॉकची प्रकिृया सुरु झाली आहे. रुग्‍णसंख्‍येत घट झाल्‍याने गुजरातमधील अनेक शहरांमध्‍ये आजपासून संचारबंदी हटविण्‍यात आली आहे. काही राज्‍यांमधील मॉल, दुकाने, बाजारपेठा, जिम आणि हॉटेल खुले करण्‍याची परवानगी देण्‍यात आली आहे.

पहा व्‍हिडिओ : अदृश्‍य हातांनी सावरले संसार

 

Back to top button