तीन फुटाची गाय! वासरू नव्हे, माय! | पुढारी

तीन फुटाची गाय! वासरू नव्हे, माय!

इंदूर : इंदूरमध्ये एक गाय आकर्षणाचे केंद्र बनली आहे. बकरीच्या बरोबरीच्या उंचीची ही गाय जगातील सर्वांत लहान प्रजातीची गाय आहे. मध्य प्रदेशात दाखल झालेली या प्रजातीची ही पहिलीच जोडी असावी. संपूर्ण वाढ झाल्यानंतरही ही गाय वासरासारखी दिसते, हे विशेष!

या गायीची किंमत 8 ते 25 लाख रुपये आहे. आंध— प्रदेशातून ही गाय इंदूरला आणली गेली. तिरुपतीच्या बालाजीचा अभिषेक याच गायीच्या दुधाने होतो, हे येथे महत्त्वाचे. या गायीला पुंगनूर गाय म्हणतात. भारतात पुंगनूर प्रजातीच्या केवळ एक हजार गायी शिल्लक आहेत. आंध— प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील गंगनूर येथे गायी बर्‍यापैकी संख्येने आहेत. येथूनच सत्तू शर्मा यांनी ही गाय इंदूरला आणली. गायीचे नाव त्यांनी गंगा, तर गोर्‍ह्याचे शंभू ठेवले आहे. या गायीच्या दुधात सुवर्णांश असतो, अशी वदंता आहे.

Back to top button