पुणे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळाला

पुणे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळाला
Published on
Updated on

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार करण्याचा प्रयत्‍न धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. चार वर्षाच्या मुलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला.

शहरातील वारजे परिसरात (शुक्रवार) सकाळी ११ वाजता हा प्रकार घडला. अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार प्रकरणी वारजे पोलिसांनी तेथे राहणार्‍या एका (२८ वर्षीय) नराधमाला अटक केली होती. मात्र तो शनिवारी पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला आहे.

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. आरोपी हा फिर्यादीच्या घरासमोर राहतो. त्याने ४ वर्षाच्या मुलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आवाजामुळे हा प्रकार इतरांच्या लक्षात आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. वारजे पोलिसांनी तत्काळ या आरोपीला शुक्रवारी अटक केली होती. त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. दरम्‍यान हा आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून गेला असून, वारजे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पहा व्हिडिओ : अनेक दुर्मिळ वस्तूंचा संग्रह असणारे कोल्हापूरचे ओबेरॉय म्युझियम 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news