पुणे : बोरीभडक येथील दोन अल्पवयीन मुलांना भरदिवसा पळवून नेले

पुणे : बोरीभडक येथील दोन अल्पवयीन मुलांना भरदिवसा पळवून नेले

बोरीभडक ( ता. दौंड जि.पुणे ) येथील दोन अल्पवयीन मुलांना भरदिवसा पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत एका मुलांच्या पालकांनी  यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

यवत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार; फिर्यादी यांचा मुलगा अॅरान एडविन नादर ( वय-12 ) याचबरोबर प्रणव संदिप गाडे  ( वय-13 वर्षे ) दोन्ही ( रा. बोरीभडक चंदनवाडी शिंदे काॅलनी जवळ ता. दौंड जि. पुणे ) येथे खेळत होती. दरम्यान, अज्ञात इसमाने या दोघांना अमिष दाखवून पळवून नेले. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक तावरे करीत आहेत.

अचानक मुलांना पळवून नेल्याची घटना घडल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण असून पोलिसांनी त्यांचा लवकर शोध घ्या अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news