

मुंबई; पुढारी ऑनलाईन: तुझ्यात जीव रंगला या मालिकेमधील राणादा आणि पाठकबाई यांनी प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाचं वेड लावलं. राणादा म्हणजेच हार्दिक जोशी आणि पाठकबाई म्हणजे, अक्षया देवधर (akshaya deodhar) होय. सध्या अक्षया देवधर हिचा दिलखुलास आणखी एकदा मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला आहे.
नुकतेच अक्षया देवधर (akshaya deodhar) हिने आपल्या इंन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने जांभळ्या रंगाच्या नऊवारीसोबत नारंगी रंगाचे ब्लाउज परिधान केला आहे. यासोबत तिने दागिन्यासोबत केसांत गजरा माळला आहे.
या फोटोत अक्षयाचे सौदर्य अप्सरा सारखे खूलून दिसत आहे. या फोटोत अक्षयाने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. यावेळी अक्षया एका तुळशीच्या कट्याजवळ उभी असल्याचे दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी वेगवेगळी प्रतिक्रीया दिल्या आहेत.
याशिवाय अक्षयाने आणखी एक साडीत फोटोशूट केले आहे. या फोटोत अक्षया मराठमोळ्या लूकमध्ये असून फिकट पांढऱ्या रंगाच्या साडीत ती दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी अनेक कॉमेंन्टस केल्या आहेत.
यात एका युजर्सने 'जेव्हा मराठीमध्ये बाहुबलीसारखे चित्रपट बनवतील तेव्हा तुच त्या चित्रपटातील देवसेना असशील'. तर दुसऱ्या एकाने 'सुंदर अप्सरा' असे म्हटले आहे. यानंतर तिसऱ्या एकाने मराठीतील देवसेना असेही म्हटले आहे. याशिवाय चाहत्यांनी प्रेमाचा ईमोजीदेखील शेअर केला आहे.
हार्दिक जोशी आगामी 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं… या मालिकेत दिसतोय. तर अक्षया नेहमी आपले हटके फोटो शेअर करत सोशल मीडियावर सक्रीय असते.
हेही वाचलंत का?