आम्हीही मेलेल्या आईचे दूध प्यायलो नाही : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil
Chandrakant Patil

कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापुरी हिसका दाखविण्याची भाषा करणार्‍यांनी आम्हीही मेलेल्या आईचे दूध प्यायलो नाही, हे लक्षात ठेवावे, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला.

सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोपावरून भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. सोमय्या यांनी थेट कोल्हापुरात येण्याचे आव्हान देत दौरा जाहीर केला आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने सोमय्या यांना 'कोल्हापुरी हिसका दाखवू,' असा इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या इशार्‍यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी 'आम्हीही मेलेल्या आईचे दूध प्यायलो नाही,' असे सांगत त्यांना प्रतिइशारा दिला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news