कागल : आम्हाला भेटूनच त्यांनी पुढे जावे! किरीट सोमय्यांना जाहीर आव्हान - पुढारी

कागल : आम्हाला भेटूनच त्यांनी पुढे जावे! किरीट सोमय्यांना जाहीर आव्हान

कागल; पुढारी वृत्तसेवा : किरीट सोमय्यांना जाहीर आव्हान : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप म्हणजे घाणेरडे राजकारण आणि निव्वळ स्टंटबाजी आहे. हिंमत असेल तर किरीट सोमय्या यांनी जनतेच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे आव्हान कागलमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांच्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आले.

किरीट सोमय्यांना जाहीर आव्हान

सोमवारी सोमय्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याने आम्ही जनता, कार्यकर्ते, सरसेनापती साखर कारखान्याचे सभासद शेतकरी, हजारो निराधार माता-भगिनी आणि पेशंट कागलमध्ये जमत आहोत. आम्हाला भेटूनच त्यांनी पुढे जावे, असेही आव्हान देण्यात आले.

जिल्हा बँकेचे संचालक बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले की, सोमय्या यांनी जे-जे प्रश्न उपस्थित केले. त्या सर्व प्रश्नांची माहिती सविस्तर देऊ, असे निवेदन मंत्री मुश्रीफ यांनी केले होते. असे असतानाही कोल्हापूर दौरा, कागल आणि कारखाना ही स्टंटबाजी कशासाठी? सोमवारी सकाळी दहा वाजता कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आम्ही पंचवीस ते तीस हजारांहून अधिक जनता जमणार आहोत. आमच्या प्रश्नांची उत्तरे देऊनच सोमय्यांनी पुढे जावे. या माध्यमातून कारखान्याचे ४० हजार सभासद शेतकऱ्यांची ते साखर बंद करु पाहत आहेत. हे कशाचे द्योतक आहे? असा सवालही श्री. माने यांनी केला.

हे ही वाचलं का?

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button