प्रेमाचा ‘ताप’ भोवला… महिला डॉक्टरवर एकतर्फी प्रेम करणार्‍या तरुणाची कारागृहात रवानगी! | पुढारी

प्रेमाचा 'ताप' भोवला... महिला डॉक्टरवर एकतर्फी प्रेम करणार्‍या तरुणाची कारागृहात रवानगी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एकतर्फी प्रेमाचे प्रकरण समोर आले आहे. हैलट रुग्णालयात उपचारासाठी आलेला रूग्ण एका महिला डॉक्टरच्या प्रेमात पडला. वेगवेगळ्या नावाने केसपेपर काढून डॉक्टरला भेटण्यासाठी तो एक दिवस आड रूग्णलायात येऊ लागला. १५ दिवसांनी महिला डॉक्टरला संशय आल्याने तिने त्याची वरिष्ठ डॉक्टरांकडे तक्रार केली. त्यानंतर रूग्णालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.

कानपूरमधील जाजमाऊ येथे राहणारा तौहीद पंधरा दिवसांपूर्वी आजारी पडला होता, तो हैलटच्या ओपीडीमध्ये उपचारासाठी गेला.  मेडिकल कॉलेजची ज्युनिअर डॉक्टर रुग्णांची तपासणी करत होती. तिने तौहीदवरही उपचार केले.  तो डॉक्टरच्या प्रेमात पडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही तो उपचाराच्या बहाण्याने रुग्णालयात गेला.

प्रेमाचा ताप असा होता की, तो एक दिवस आड दवाखान्यात येऊ लागला. डॉक्टरला भेटण्यासाठी तो  वेगवेगळ्या नावाने केसपेपर काढून उपचार घेण्यासाठी रूग्णालयात जायचा. त्या डॉक्टर जिथे ड्युटीवर असायच्या तिथे तो जात असे. १५ दिवस असेच केल्याने डॉक्टरांनाही संशय आला. महिला डॉक्टरने वरिष्ठांकडे तक्रार केली. शनिवारी तौफिद पुन्हा एकदा ओपीडीमध्ये आला. तेथे ज्युनिअर डॉक्टरची ड्युटी लावली नसल्याने त्याने विचारणा करताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याची धुलाई केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

तौहीद काय म्हणाला?

ज्युनिअर डॉक्टरच्या तक्रारीवरून स्वरूप नगर पोलिसांनी तौहीदविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. पोलिसांनी तौहीदला न्यायालयात हजर केले असता, त्याने सांगितले की, मी औषध घेण्यासाठी गेलो होतो. केसपेपर एकदा किंवा दोनदाच बनवला होता; पण आता मी तिथे कधीच जाणार नाही, असे तो म्हणाला. एडीसीपी अनिता सिंग यांनी सांगितले की, तो उपचाराच्या बहाण्याने हॉस्पिटलमध्ये ज्युनियर डॉक्टरकडे जात असे. डॉक्टरच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली.

हेही वाचा :

Back to top button