पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री नेहा शर्मा (Neha Sharma B'day ) आपल्या टोन्ड फिगर आणि बोल्डनेसमुळे चर्चेत असते. नेहा आज बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. २१ नोव्हेंबर रोजी ती आपला वाढदिवस साजरा करत आहे. नेहा शर्माने वयाची ३५ वर्षे पूर्ण केली आहेत. नेहाला राजकीय घराण्याचा वारसा आहे, हे फार कमी लोकांना कदाचित माहिती असावी. (Neha Sharma B'day )
अभिनेत्री नेहा शर्माचा जन्म २१ नोव्हेंबर, १९८७ रोजी बिहारमधील भागलपूर येथे झाला. नेहाने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर साऊथ फिल्म इंडस्ट्रीतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने बिहारमधून शिक्षण घेतले. इमरान हाश्मीसोबत 'क्रुक' चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.
नेहाचे वडील अजित शर्मा हे बिहारच्या राजकारणातील एक प्रसिद्ध नाव आहे. ते भागलपूरमधून काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. बिहारमधून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नेहा उच्च शिक्षणासाठी दिल्लीत आली आणि फॅशन डिझायनिंगमध्ये तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केले.
अभिनयासोबतच नेहाला नृत्याचीही खूप आवड आहे. तिने कथ्थक देखील शिकले आहे, लंडनमधील पायनॅपल डान्स स्टुडिओमधून स्ट्रीट हिप हॉप, लॅटिन डान्सिंग साल्सा, मेरेंग्यू, जिव्ह आणि जॅझ या नृत्य प्रकारांचे प्रशिक्षण घेतले आहे. नेहा शर्माही वडिलांसाठी मते मागण्यासाठी भागलपूरला पोहोचली होती. वडिलांच्या समर्थनार्थ तिने रोड शोही केला.
तिची बहिण आयशा शर्माही बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यात बिझी आहे. नेहा इतकीच आयशा बोल्डआहे. नेहा शर्माच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तिने २००७ साली तेलुगू चित्रपट 'चिरुथा'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर, २०१० मध्ये, आणखी एका साऊथ चित्रपटाद्वारे, त्याचवर्षी 'क्रुक' चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नेहाने 'क्या सुपर कूल हैं हम', 'जयंतभाई की लव्ह स्टोरी', 'यमला पगला दीवाना २', 'यंगिस्तान', 'तुम बिन 2', 'मुबारकां' आणि 'तानाजी' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.