सर्वोच्च न्यायालयातील ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर | पुढारी

सर्वोच्च न्यायालयातील ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील ९२ नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी इतर मागावर्गीय अर्थात ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही, या विषयावरची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासोबतच थेट नगराध्यक्ष निवडीच्या पध्दतीवर सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल येणे अपेक्षित आहे.

ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ९२ नगरपरिषदांना लागू होत नव्हता. पण राज्य सरकारने या निकालावर पुनर्विलोकन याचिका दाखल केलेली आहे. सदर प्रकरणावर पुढील सुनावणी २८ नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भातील याआधीची सुनावणी २३ ऑगस्ट रोजी झाली होती. त्यानंतर केवळ तारखा पडत आहेत. सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन केले जाईल, असे न्यायालयाने त्यावेळीच स्पष्ट केले होते.

हेही वाचलंत का?

Back to top button