INDvsNZ T20 : भारत-न्यूझीलंड सामन्यांचे ‘या’ चॅनलवर थेट प्रक्षेपण, घरी बसून मोफत घ्या आनंद | पुढारी

INDvsNZ T20 : भारत-न्यूझीलंड सामन्यांचे ‘या’ चॅनलवर थेट प्रक्षेपण, घरी बसून मोफत घ्या आनंद

वेलिंग्टन, पुढारी ऑनलाईन : INDvsNZ T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेला शुक्रवारपासून वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. BCCI ने न्यूझीलंड दौऱ्यासाठी टी 20 विश्वचषक संघातील बहुतांश खेळाडूंना विश्रांती दिली आहे. स्टार फलंदाज विराट कोहली, अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यांच्यासह नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत. अष्टपैलू हार्दिक पांड्या तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करेल. तर त्यानंतरच्या वनडे मालिकेत शिखर धवन कर्णधार असणार आहे.

भारतात कोणत्या वाहिनीवर सामन्यांचे प्रक्षेपण?

स्टार स्पोर्ट्स किंवा सोनी स्पोर्ट्स या दोघांनाही न्यूझीलंड क्रिकेट संघाचे त्यांच्या मायदेशातील सामने प्रसारित करण्याचा अधिकार नाही. मालिकेचे थेट प्रक्षेपण करणारे दूरदर्शन स्पोर्ट्स हे भारतातील एकमेव टीव्ही चॅनल आहे. टीम इंडियाचे चाहते वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौऱ्याप्रमाणेच ही मालिका डीडी स्पोर्ट्सवर थेट पाहू शकतील.

लाइव्ह स्ट्रीमिंगचे प्लॅटफॉर्ममध्ये बदल

अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ आपल्या प्लॅटफॉर्मवरून सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग करेल. प्रथमच, भारतीय पुरुष क्रिकेट संघाशी संबंधित मालिका अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर थेट प्रक्षेपित केली जाईल. सामना थेट पाहण्यासाठी चाहत्यांना सबस्क्रिशन घ्यावे लागेल. या तीन सामन्यांच्या मालिकेत कोणता संघ टॉपवर राहतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर दोन्ही संघ नव्याने सुरुवात करतील.

टी 20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना : 18 नोव्हेंबर (शुक्रवार) : वेलिंग्टन
दुसरा सामना : 20 नोव्हेंबर (रविवार) : तौरंगा
तिसरा सामना : 22 नोव्हेंबर (मंगळवार) : नेपियर

वनडे मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना : 25 नोव्हेंबर : भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 7 वाजता : ऑकलंड
दुसरा सामना : 27 नोव्हेंबर : भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 7 वाजता : हॅमिल्टन
तिसरा सामना : 30 नोव्हेंबर : भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७ वाजता : ख्राइस्टचर्च

Back to top button