माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचे नातू इंद्रजित सिंग यांना 
केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी भाजपचे प्राथमिक सदस्यत्व दिले.
माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचे नातू इंद्रजित सिंग यांना केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी भाजपचे प्राथमिक सदस्यत्व दिले.

माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या नातवाचा भाजपमध्ये प्रवेश

Published on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचे नातू इंद्रजित सिंग यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ग्यानी झैलसिंग यांचे नातू इंद्रजित सिंग यांना केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी  भाजपचे प्राथमिक सदस्यत्व दिले.

आगामी काळात होणार्‍या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षीय नेत्यांच्या कोलांट्या उड्या सुरु झाल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच उत्तराखंडमधील पुरोला मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार राजकुमार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तत्पूर्वी उत्तराखंड क्रांती दलाचे नेते व धनौल्टीचे आमदार प्रीतम पवार यांनीही भाजप प्रवेश केला होता.

पुढील वर्षाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिूपर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच्या काही महिन्यातच गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्याही निवडणुका होतील. गुजरातमध्ये नुकताच भाजपने आमदार मुख्यमंत्री बदलला असून भूपेंद्र पटेल यांना संधी दिलेली आहे.

हेही वाचलं का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news