US Open : डॅनिल मेदवेदेवने पटकावले 'अमेरिकन ओपन'चे विजेतेपद - पुढारी

US Open : डॅनिल मेदवेदेवने पटकावले 'अमेरिकन ओपन'चे विजेतेपद

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकन खुल्‍या टेनिस ( US Open ) स्‍पर्धेच्‍या पुरुष एकेरीच्‍या अंतिम सामन्‍यात सर्बियाच्‍या अग्रमानांकित नोव्‍हाक जोकोव्‍हिच याला पराभवाचा धक्‍का बसला. त्‍याचे अमेरिकन खुल्‍या टेनिस ( US Open ) स्‍पर्धेच्‍या विजेतेपद पटकावून २१ ग्रँडस्‍लॅम जेतेपद जिंकण्‍याचा आणि यंदा सर्वच ग्रँडस्‍लॅम स्‍पर्धा जिंकण्‍याचे स्‍वप्‍नभंग झाले. अंतिम सामन्‍यात रशियाच्‍या दुसर्‍या मानांकित डॅनिल मेदवेदव यांनी बाजी मारली. मेदवेदेवने जोकोविच याचा ६-४, ६-४, ६-४ असा पराभव केला. सलग तीन सेट जिंकत त्‍याने अमेरिकन खुल्‍या स्‍पर्धेच्‍या जेतेपदावर आपले नाव कोरले.

जोकोव्‍हिच याचे स्‍वप्‍नभंग

१९६९मध्‍ये रॉड लीव्‍हर यांनी एकवर्षातील सर्व चार ग्रँडस्‍लॅम जिंकत कॅलेंडर ग्रँड स्‍लॅम जिंकले होते. यानंतर एकाही पुरुष टेनिसपटूला अशी कामगिरी करता आली नाही. जोकोव्‍हिच याला अमेरिकन ओपन स्‍पर्धा जिंकून इतिहास घडविण्‍याची संधी होती. यंदाच्‍या वर्षी जोकोविच याने ऑस्‍ट्रेलियन ओप, फ्रेंच ओपन आणि विम्‍बडन ओपन स्‍पर्धेचे जेतेपद पटकावले होते. अमेरिकन खुल्‍या टेनिस स्‍पर्धेत अंतिम सामना जिंकून इतिहास घडविण्‍याची संधी त्‍याला होती. अंतिम सामन्‍यात जोकोव्‍हिच विजय ठरला असता तर त्‍याने २१ वे ग्रँडस्‍लॅम जिंकले असते. मात्र त्‍याचा सलग तीन सेटमध्‍ये मेदवेदेव याने पराभव केला.

अंतिम सामन्‍यात मेदवेदेव याने उत्‍कृष्‍ट खेळीचे प्रदर्शन केले. अग्रनामांकित जोकोव्‍हिच याचा त्‍याने सलग तीन सेटमध्‍ये पराभव केला. संपूर्ण सामन्‍यात जोकोव्‍हिच समोर मेदवेदेव याच खेळ सरसच होता. जोकोविच सुरुवातीपासूनच संघर्ष करताना दिसून आला. मेदवेदेव याने सामन्‍यावरील आपली पकड कायम ठेवली.

जोकोव्‍हिच झाला भावूक

अंतिम सामन्‍यात पराभूत झाल्‍यानंतर जोकोव्‍हिच भावनाविश झाला. त्‍याला आपले अश्रु रोखता आले नाहीत. याचा व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहेत.

अंतिम सामन्‍यात जोकोविचचा हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी टोकियो ऑलिम्‍पिकमध्‍येही त्‍याचा अंतिम सामन्‍यात पराभव झाला होता. या सामन्‍यानंतर बोलताना जोकोव्‍हिच म्‍हणाला, यापूर्वी मला न्‍यूयॉर्कमध्‍ये असा कधीच वाटलं नव्‍हत. सामना जिंकण्‍यासाठी मी प्रामणिक प्रयत्‍न केले. मागील काही आठवड्यांपासून मी मानसिक आणि भावात्‍मक पातळीवर अधिक सक्षम होण्‍यासाठी प्रयत्‍न केला. मात्र आजच्‍या पराभवामुळे ही व्‍यथित झालो आहे.

मेदवेदेव याने मागितली माफी

अंतिम सामना सुमारे अडीच तास चालला. प्रत्‍येक सेटमध्‍ये मदवेदेव आघाडीवर होता. सामना जिंकल्‍यानंत मेदवेदेव याने कोर्टवर स्‍वत:ला झोकून दिले. तसेच त्‍याने जोकोविचची माफी मागितली. तो म्‍हणाला, मी जोकोविचच्‍या चाहत्‍यांची माफी मागतो. माझ्‍यासाठी जोकोव्‍हिच हे महान टेनिसपटू आहेत, असेही त्‍याने सांगितले.

हेही वाचलं का? 

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

 

Back to top button