हसन मुश्रीफांचा पलटवार : सोमय्यांच्या CA च्या पदवीवरच संशय; १०० कोटींचा दावा दाखल करणार | पुढारी

हसन मुश्रीफांचा पलटवार : सोमय्यांच्या CA च्या पदवीवरच संशय; १०० कोटींचा दावा दाखल करणार

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : भाजप खासदार किरिट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींचे बेनामी व्यवहार केल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांनी पलटवार केला आहे.

किरीट सोमय्या यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत. त्यांच्यावर १०० कोटींचा अब्रू नुकसानीचा कोल्हापूर जिल्हा न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. चंद्रकांत पाटील यांच्याविरोधातही तक्रार दाखल करणार असल्याचाचे त्यांनी म्हटले आहे. रस्ते घोटाळ्यांवरून त्यांनी चंद्रकात पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे ते म्हणाले.

सोमय्यांचा तीव्र निषेध करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यामध्ये हजारो शेतकऱ्यांची गुंतवणूक असल्याची त्यांना माहिती नसावी. त्यांनी खुशाल हवी तिथं तक्रार करावी असे आव्हानही त्यांनी दिले. सोमय्यांनी केलेल्या आरोपामुळे कोल्हापुरात भाजपचा पराभव निश्चित असल्याचे ते म्हणाले.

हसन मुश्रीफ काय म्हणाले?

Back to top button