मुळा धरण क्षेत्रात पाण्याची मोठी आवक, धरण ८८ टक्के भरले | पुढारी

मुळा धरण क्षेत्रात पाण्याची मोठी आवक, धरण ८८ टक्के भरले

नगर; पुढारी वृत्तसेवा : हरिश्चंद्र गड, आंबित, कोतूळ भागात पावसाने जोर धरल्याने मुळा नदी दुथडी वाहत आहे. त्यामुळे मुळा धरण क्षेत्रात पाण्याची मोठी आवक सुरु आहे. त्यामुळे मुळ धरण ८८ टक्के भरले आहे.

मुळा पाणलोटात अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. जिल्ह्याती सर्वात मोठे व 26 टीएमसी क्षमता असलेले धरण भरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मागील तीन दिवसांपासून मुळा पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे. रविवारी धरणामध्ये दहा हजार क्‍युसेकने आवक सुरू होती. त्यामुळे धरण ८८ टक्के भरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास चार-पाच दिवसांत हे धरणही ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

हेही वाचलं का ? 

 

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

व्‍हिडिओ

Back to top button