J&K : जम्मू काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा | पुढारी

J&K : जम्मू काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा

पुढारी ऑनलाईनडेस्क : J&K जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांच्या एका गटामध्ये झालेल्या चकमकीमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा (terrorist killed) करण्यात आला आहे. येथील कुपवाडा जवळील नियंत्रण रेषेवर सुदपोरा येथे घडलेल्या या घटनेनंतर शस्त्रास्त्र आणि दारूगोळा जप्त करण्यात आला असून अधिक दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरु असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कुपवाडा येथील नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी (दि. २५) रात्री काही दहशतवादी अमली पदार्थांसह घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या एका तुकडीला मिळाली. यानुसार तुकडीने जोरदार मोहीम राबवली, या दरम्यान मध्यरात्री दहशतवादी आणि सैनिकांमध्ये जोरदार चकमक झाली. या गोळीबारामध्ये एक दहशतवादी ठार झाला तर इतर दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ठार झालेल्या दहशतवाद्याकडून एक एके रायफल, एक पिस्तुल जप्त करण्यात आली असून हे दहशतवादी एलईटी गटाचे असल्याचा संशय आहे.

हे वाचलंत का? 

Back to top button