राष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा | पुढारी

राष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी दिवाळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘प्रकाश आणि उत्साहाच्या या पवित्र सणावेळी आपण ज्ञान आणि ऊर्जेचा दीपक प्रज्वलित करून सर्वांच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न करू या’, असे राष्ट्रपती मुर्मू यांनी संदेशात म्हटले आहे.़

दिवाळीचा सण प्रकाशाशी जोडला गेलेला आहे. हा पावन पर्व आपल्या सर्वांच्या जीवनात सुख आणि समृद्धीची भावना पुढे नेवो. मला आशा आहे की, आपण कुटुंबीय आणि मित्रांसोबत शानदारपणे दिवाळी साजरी कराल’ असे पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. ‘दिवाळीचा प्रकाशपर्व सर्वांच्या जीवनात ज्ञान, शुभ आणि समृद्धी आणेल’, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी संदेशात म्हटले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीदेखील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button