दीपोत्सव : जाणून घ्या लक्ष्मीपूजन मुहूर्ताची वेळ | पुढारी

दीपोत्सव : जाणून घ्या लक्ष्मीपूजन मुहूर्ताची वेळ

श्री लक्ष्मीपूजन

नरकचतुर्दशी या दीपावलीतील मुख्य सणाच्या दिवसाबरोबर आज, सोमवारी (दि.२४) लक्ष्मीपूजन हा दीपोत्सवातील उत्सव येत आहे. धन-धान्य समृद्धी, सौख्यासह वैभव आणि मानसिक समाधान प्राप्त व्हावे, यासाठी लक्ष्मीपूजनादिवशी मनोभावे प्रार्थना करावी, असे सांगितले जाते.

लक्ष्मीपूजन मुहूर्त

दुपारी 3.00 ते सायं. 6.00,
सायं. 6.00 ते रात्री 8.30,
रात्री 10.30 ते रात्री 12.00

व्यापारी वर्गासाठी आश्विनातील अमावास्या शुभ आहे. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे, अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाचे दिवशी घर, दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धीसाठी प्रार्थना करावयाची असते.

नमस्ते सर्वदेवानां
वरदाऽसि हरिप्रिये ।
या गतिस्त्वत्प्रपन्नानां
सा मे भूयात् त्वदर्चनात् ॥
अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी आणि
धनदाय नमस्तुभ्यं
निधिपद्माधिपायच ।
भवन्तु त्वत्प्रसादेन
धनधान्यादिसम्पदः ॥
अशी कुबेराची प्रार्थना करावी.

या पूजेत समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात.

– दाते पंचांगकर्ते

Back to top button