चीन-पाकिस्तानवर आता पाण्यातूनही अणुहल्ला शक्य | पुढारी

चीन-पाकिस्तानवर आता पाण्यातूनही अणुहल्ला शक्य

कोलकाता;  वृत्तसंस्था :   बंगालच्या उपसागरात आयएनएस अरिहंत पाणबुडीतून भारतीय नौदलाच्या अधिकार्‍यांनी ट्रिगर दाबताच शुक्रवारी के-15 एसएलबीएम क्षेपणास्त्र सुसाट सुटले. 750 कि.मी. अंतरावरील लक्ष्याचा त्याने भेद केला… आणि भारत पाण्याखालूनही अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम बनला. या यशस्वी चाचणीसह भारत आता अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन व्यतिरिक्त जगातील सहावा ‘न्यूक्लिअर ट्राएड’ देश बनला आहे. याआधीही भारताने 3,500 किलोमीटर अंतरापर्यंतचे लक्ष्य उद्ध्वस्त करू शकतील, अशा बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या यशस्वी केल्या आहेत.

जगातील 6 ‘न्यूक्लिअर ट्राएड’ देशांत भारतही!

‘न्यूक्लिअर ट्राएड’ म्हणजे काय?
क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून अण्वस्त्रे जमिनीवरून, हवेतून लढाऊ विमानांच्या माध्यमातून आणि समुद्रातून पाणबुड्यांच्या माध्यमातून डागण्याच्या तिहेरी क्षमतेला ‘न्यूक्लिअर ट्राएड’ असे म्हणतात.

समुद्रातून हल्ला

पाण्याखालून डागल्या जाणार्‍या ‘के’ क्षेपणास्त्रांतील भारताची सद्य:स्थिती

1. 15 एसएलबीएम (शॉर्टरेंज बॅलेस्टिक क्षेपणास्त्र) क्षमता – 750 ते 1500 किमी (वापरात आहे)

2. के- 4 एसएलबीएम (मीडियम रेंज बॅलेस्टिक क्षेपणास्त्र) क्षमता – 3500 किमी पेक्षा जास्त (चाचणी झाली आहे)

3.  के- 5 एसएलबीएम (इंटरकॉन्टिनेन्टल बॅलेस्टिक क्षेपणास्त्र) क्षमता – 5000 किमी पेक्षा जास्त (चाचणी झाली आहे)

4. के- 5 एसएलबीएम (इंटरकॉन्टिनेन्टल बॅलेस्टिक क्षेपणास्त्र) क्षमता – 5000 ते 6000 किमी (काम सुरू आहे)

5. के- 5 एसएलबीएम (इंटरकॉन्टिनेन्टल बॅलेस्टिक क्षेपणास्त्र) क्षमता – 6000 ते 8000 किमी (काम सुरू आहे)

…तर पाकिस्तान गायब

भावी काळात पाकिस्तान भारतावर अण्वस्त्र हल्ल्याचा विचार करू शकणार नाही. पाकने तसे केले तरी के-15 एसएलबीएम लाँच केल्यानंतर भारताने विशाल समुद्रातून कोठूनही संपूर्ण पाकिस्तान बेचिराख करण्याची क्षमता विकसित केली आहे.

 

 

 

 

 

Back to top button