CNG- PNG prices | सीएनजी ३ रुपयांनी महागला, पीएनजी दरातही २ रुपयांची वाढ | पुढारी

CNG- PNG prices | सीएनजी ३ रुपयांनी महागला, पीएनजी दरातही २ रुपयांची वाढ

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाच्या राजधानीत सीएनजी तसेच पीएनजी दरात (CNG- PNG prices) शनिवारी तीन रुपयांची वाढ करण्यात आली. केंद्र सरकारने १ ऑक्टोबरपासून नैसर्गिक गॅस दरात ४० टक्क्यांची वाढ केल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे. सीएनजी दरात गेल्या चार महिन्यांत तर पीएनजी दरात गेल्या दोन महिन्यांत पहिल्यांदा वाढ करण्यात आली आहे.

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (आयजीएल) नुसार नवीन दरवाढीनंतर दिल्लीत सीएनजीचे दर ७५.६१ रुपये किलोग्रॅमने वाढून ७८.६१ रुपये किलोग्रॅमपर्यंत पोहचले आहे. तर, पीएनजीचे दर ५३.५९ रुपये सॅन्डर्ड क्यूबिक मीटर (एससीएम) पर्यंत पोहचले आहेत. दिल्लीत ७ मार्च २०२२ पासून आतापर्यंत सीएनजी दरात १४ वेळा दरवाढ करण्यात आली आहे. याकाळात सीएनजी २२.६० रुपयांनी महागला. यापूर्वी २१ मे रोजी सीएनजी दरात २ रुपये प्रती किलोप्रमाणे वाढ करण्यात आली आहे.

आकडेवारीनूसार एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत दिल्लीत सीएनजीचे दर ३५.२१ रुपयांनी वाढले आहेत. तर, ऑगस्ट २१ पासून आतापर्यंत पीएनजी दरात १० वेळा वाढ करण्यात आली आहे. दरम्यानच्या कालावधीत पीएनजी २९.९३ रुपयांनी महागला. आयजीएलनुसार राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद तसेच गुरूग्रामसह उत्तर प्रदेशातील कानपूर आणि राजस्थानमधील अजमेर सारख्या शहरातील सीएनजी आणि पीएनजी दरात वाढ करण्यात आली आहे. (CNG- PNG prices)

हे ही वाचा :

Back to top button