Natural Gas Prices | नैसर्गिक वायू दरात ४० टक्के वाढ, सीएनजी, पीएनजी महागणार

Natural Gas Prices | नैसर्गिक वायू दरात ४० टक्के वाढ, सीएनजी, पीएनजी महागणार
Published on
Updated on

मुंबई/नवी दिल्ली : महागाईच्या चटक्यांची दाहकता शनिवारपासून म्हणजे १ ऑक्टोबरपासून आणखी वाढणार आहे. केंद्र सरकारने नैसर्गिक वायुची (Natural Gas Prices) किंमत 40 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे घरगुती गॅसच्या दराबरोबरच वाहतुकीच्या खर्चातही वाढ होणार आहे. नैसर्गिक वायुची किंमत 6.1 डॉलर प्रति एमएनबीटीयू वरून 8.57 डॉलर्स इतकी वाढवण्यात आली आहे. एप्रिलमध्ये झालेली वाढ दुप्पट होती.

दरवर्षी एप्रिल आणि ऑक्टोबर अशा दोन वेळेला नैसर्गिक वायुच्या दराचा आढावा घेऊन दर वाढवले अथवा कमी केले जातात. नैसर्गिक वायुच्या किमती 1 डॉलरने वाढल्यास सीएनजीच्या दरात 4.5 रुपये प्रति किलो इतकी वाढ होते. शनिवारपासून होणार्‍या दरवाढीमुळे सीएनजीचा दर 12 ते 13 रुपये किलोने वाढण्याची शक्यता आहे.

नैसर्गिक वायूच्या दरात (Natural Gas Prices) मोठी वाढ झाल्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक वायू इतर गोष्टींबरोबरच वीज निर्मितीस मदत करतो. नैसर्गिक वायूच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने CNG आणि पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) ची किंमत वाढण्याची शक्यता आहे. ज्याच्या किमती गेल्या वर्षभरात ७० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. एप्रिल २०१९ पासून नैसर्गिक वायूच्या दरांमध्ये झालेली ही तिसरी वाढ आहे. त्याचप्रमाणे खत निर्मितीचा खर्चही वाढणार आहे. मात्र, केंद्र सरकार खतांवर अनुदान देत असल्याने त्याचे दर वाढण्याची शक्यता नाही.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news