मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची कायदे मंत्र्यांशी चर्चा | पुढारी

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची कायदे मंत्र्यांशी चर्चा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला पुन्हा एकदा वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजीजु यांच्या सोबत आरक्षणासंबंधी चर्चा केल्याचे कळतेय. यापूर्वीच मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत आले होते, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले होते.
गुरुवारी (दि.२२) मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजी राजे यांची भेट घेऊन त्यांच्या सोबत देखील आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी, रात्री मराठा आरक्षणासंबंधी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय आरक्षणासंदर्भात विधी तज्ञासोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्याचे देखील कळतेय.त्यामुळे आता आरक्षणाच्या मुद्द्याला वेग येण्याची शक्यता आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button