Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडणार? | पुढारी

Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क  : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री सोडणार असल्याचेही त्यांनी संकेत दिले आहेत. गहलोत यावेळी बोलताना म्हणाले की, जर कोणाला काँग्रेस अध्यक्ष बनायचे असेल तर मुख्यमंत्रीपदी कसे राहता येईल. आजवर असे कधीही झालेले नाही. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास लवकर सुरूवात होणार आहे. याबाबत काँग्रेसने अधिसुचना लागू केली आहे, यानंतर काँग्रेस पक्षात हालचाली वाढल्या आहेत. (Congress president election)

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आत्तापर्यंत अशोक गहलोत आणि खासदार शशी थरूर यांची नावे चर्चेत होती. मात्र, दिग्वीजय सिंह आणि मनीष तिवारी यांच्याही नावांची चर्चाही सुरू झाली आहे. दरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेसाठी केरळला गेले आहेत. दरम्यान अशोक गहलोत हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांनीच काँग्रेसचे अध्यक्षपद घ्यावे अशी विनंती करणार आहेत. तरीही त्यांनी नकार दिला तर अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज आपण भरु असे गहलोत यांनी स्पष्ट केले. यावेळी माध्यमांना माहिती देताना गेहलोत म्हणाले, मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. नंतर निवडणुकाही होऊ शकतात. काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली तरीही राजस्थानपासून दूर जाणार नाही. मी राजस्थानच्या लोकांनी सेवा करतच राहिन. (Congress president election)

अध्यक्षपदासाठी दिग्वीजय सिंह यांच्या नावाचीही चर्चा

काँग्रेस अध्यक्षपदासाठी दिग्वीजय सिंह याच्या नावाचीही चर्चा आहे. ते काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे मानले जात आहे. याबाबत दिग्वीजय सिंह म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष गांधी घराण्यातील नसला तरीही गांधी घराण्याची भूमिका महत्वाची असणार आहे. तसेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ३० सप्टेंबर वाट पाहणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. (Congress president election)

काँग्रेस अध्यक्ष न बनण्याच्या निर्णयावर राहुल गांधी ठाम (Congress president election)

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढणार नसल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना सल्ला दिला आहे. राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही अशा ऐतिहासिक पदावर जाणार आहात, जे पद भारतासाठी महत्वपूर्ण राहिले आहे. ‘काँग्रेस अध्यक्ष’ हे एक वैचारिक पद आहे. तुम्ही भारताच्या एका दृष्टीकोणाचे प्रतिनिधीत्व करणार आहात.

हेही वाचलंत का?

Back to top button