रोज १० ते १५ पुरुषांकडून अल्पवयीन मुलीचे शोषण; गुरुग्राम येथील घटना | पुढारी

रोज १० ते १५ पुरुषांकडून अल्पवयीन मुलीचे शोषण; गुरुग्राम येथील घटना

दिल्ली; पुढारी ऑनलाईन : हरियाणातील गुरुग्राम येथील एका स्पामध्ये १४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार घडल्याची घटना समोर आली आहे. या बाबतीत पोलिसांनी सांगितले की, स्पाच्या मालकाने पीडित मुलीला आरोपींसोबत शारीरिक संबध ठेवण्यासाठी दबाव आणला. या प्रकरणी सेक्टर ५१ मधील पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.१४) रात्री चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये स्पा चालवणाऱ्या महिलेचा समावेश आहे.

पीडितेने पोलिसांत नोंदवलेली ही दुसरी तक्रार असल्याचे सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने सांगितले की, जेव्हा ती पहिल्यांदा पोलिसांकडे गेली तेव्हा तिला खोटे बोलण्यास भाग पाडले गेले की तिचे आरोपी रुबलवर प्रेम आहे आणि त्याने तिला लग्नाचे वचन दिले होते. यानंतर हे प्रकरण मिटविण्यात आले. मुलीने सांगितले की, आरोपीने नंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला आणि तिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पीडितेने तिच्या खऱ्या वयाचा कोणताही पुरावा अद्याप दिलेला नाही आणि ती अल्पवयीन आहे की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ते वस्तुस्थितीची पडताळणी करत असून कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ही तरुणी सेक्टर 49 परिसरात राहत होती आणि नोकरीच्या शोधात होती. दरम्यान, सुमारे महिनाभरापूर्वी तिची पूजा नावाच्या महिलेशी निर्वाण कोर्टयार्डमध्ये भेट झाली आणि तिला डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये नोकरीची ऑफर देण्यात आली. ती डॉक्टरांच्या दवाखान्यात काम करू लागली. मात्र अवघ्या दोन दिवसांतच तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

सुमारे 15 दिवसांनंतर, पूजा तिला पुन्हा भेटली आणि यावेळी तिला ओमॅक्स गुरुग्राम मॉलच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या किंग स्पामध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी करण्याची ऑफर दिली. पोलिसांनी सांगितले की, झुमा नावाची महिला स्पा चालवत होती, पीडित मुलीला पूजा ही स्पाची मालकीन आपली मावशी असल्याचे सांगायची.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, “माझ्या नोकरीच्या पहिल्या दिवसापासूनच माझे शोषण सुरू झाले, जेव्हा मला जबरदस्तीने एका स्पा रूममध्ये एका व्यक्ती सोबत पाठविण्यात आले. त्या व्यक्तीने माझ्यावर बलात्कार केला.” पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलीला जेव्हा नोकरी सोडायची होती, तेव्हा तिला पुरुषासोबतचा तिचा अश्लील व्हिडिओ दाखवण्यात आला आणि तिला नोकरी चालू ठेवण्यास भाग पाडले गेले.

पीडित तरुणीने तक्रारीत लिहिले आहे की, “मी पुढे पाच दिवस स्पामध्ये कामाला गेले होते. यादरम्यान दररोज 10 ते 15 पुरुषांकडून माझे लैंगिक शोषण केले जात होते.” एफआयआरनुसार, पीडितेने तिच्या आईच्या मदतीने नोकरी सोडली, परंतु आरोपी झुमा, पूजा, रुबेल आणि सद्दाम यांनी तिचा छळ करणे थांबवले नाही. दोन आठवड्यांपूर्वी ती दुसऱ्यांदा पोलिसात गेली होती. ती म्हणाली, “माझ्या आई-वडिलांचा आणि माझ्या जीवाला धोका असल्याने मी आता तक्रार दाखल करत आहे. निष्पाप मुलींना अडकवून त्यांचे शोषण करणारी ही टोळी आहे.”

तक्रारी नुसार चारही आरोपींवर सामूहिक बलात्कार, दुखापत करणे, धमकावणे आदीसह पास्को कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा :

Back to top button