Nashik | पोलीस व उद्योजक यांच्यातील संवाद प्रक्रिया वाढविण्यावर भर : आयुक्त संदीप कर्णिक

Nashik | पोलीस व उद्योजक यांच्यातील संवाद प्रक्रिया वाढविण्यावर भर : आयुक्त संदीप कर्णिक

सिडको : पुढारी वृत्तसेवा- औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षिततेला प्राधान्य देण्यावर आमचा सातत्याने भर असतो. पोलिस आणि उद्योजक यांच्यातील संवाद प्रक्रिया वाढली पाहिजे आणि त्यास आपले पूर्ण सहकार्य राहील,असे प्रतिपादन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले. अंबड औद्योगिक वसाहतीत चुंचाळे पोलिस चौकी येथे नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे प्रथम टप्प्यातील 50 बॅरिकेट्सचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्याप्रसंगी  आयुक्त कर्णिक बोलत होते

या वेळी व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, सचिव निखिल पांचाळ, उपाध्यक्ष राजेंद्र अहिरे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सहाय्यक आयुक्त गुन्हे संदीप मिटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते.

या वेळी कर्णिक म्हणाले की, उद्योजकांकडून सामाजिक दायित्वामध्ये फक्त डोनेशनच न घेता त्यांच्याशी संवाद वाढवून त्यांनाही आपल्या कार्यक्रमांमध्ये कसे सामावून घेता येईल असाही प्रयत्न केला पाहिजे असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सुचवले, उद्योजक हा समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून रोजगार निर्मिती करणारे ते आहेत त्यामुळे त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते असे उद्गार यावेळेस त्यांनी काढले. निमा ॲपच्या वेळेसही उद्योजकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती याची हि आठवण त्यांनी यावेळेस काढली, उद्योजकांशी वारंवार संवाद राखल्याने निश्चितच चांगल्या गोष्टी घडवण्यास मदत होईल असे ते म्हणाले.

नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन -निमा चे पोलीस दलास नेहमीच सहकार्य असते. त्यांच्या तर्फे देण्यात आलेल्या भक्कम आणि टिकाऊ अशा या बॅरिकेटचा वाहतूक सुरक्षिततेच्यादृष्टीने व औद्योगिक वसाहतीत नेहमीच परदेशातील पाहुणे व मोठमोठ्या कंपन्यांचे अधिकारी येत असतात त्यामुळे अश्या पॉश ठिकाणी या पॉश दिसणाऱ्या बेरिकेटचा चा वापर करावा असे त्यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सुचवले त्यामुळे उद्योजकांचा एरिया सुद्धा सुंदर दिसेल असेही आयुक्त संदीप कर्णिक पुढे म्हणाले.

अंबड आणि सातपूर औद्योगिक परिसरातील सुरक्षा यंत्रणा तसेच वाहतूक व्यवस्थापनाचे योग्य नियोजन व्हावे यासाठी पोलीस दलाला निमातर्फे पोलीस दलास टिकाऊ आणि भक्कम बॅरिकेट्स प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे. सामाजिक बांधिलकीच्या लदृष्टीने मोठे छोटे उद्योजक त्यांच्या सामाजिक द्वायित्व निधीतून नेहमीच सहकार्याची भूमिकेतून कामे करीत असतात असे करत असताना निमा पदाधिकाऱ्यांनी सुद्धा निमा मार्फत आपण सामाजिक दायित्व म्हणून हे बॅरिकेट देण्याचे निश्चित केले होते, निमा नेहमीच उद्योग वाढीसाठी व उद्योजकांच्या सक्षमीकरणाकरिता विविध उपक्रम राबवित असते,त्याची आठवण करून देताना चुंचाळे पोलीस चौकीचे लवकरात लवकर पोलीस स्टेशनमध्ये रूपांतर व्हावे यासाठी आपल्या मार्फत प्रयत्न करावे. आणि येथे डिसिपी 2 व एसीपीचे कार्यालय देखील आणावे अशी मागणी,निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी माननीय पोलीस आयुक्त यांना केली.प्रारंभी धनंजय बेळे तसेच निमा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व मान्यवर पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन निमाचे उपाध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी केले. कार्यक्रमास मनीष रावल, सतीश कोठारी, संजय सोनवणे, नितीन आव्हाड, दिलीप वाघ, रवींद्र झोपे, राजेंद्र कोठावदे, दिलीप वाघ, प्रकाश ब्राह्मणकर, विजय जोशी, जयंत जोगळेकर, उमेश कोठावदे, विनोद कुंभार, जयंत पगार, राम जोशी यांच्यासह 100 हुन अधिक उद्योजक उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news