दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी सतीशचंद्र शर्मा

नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा : दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून सतीशचंद्र शर्मा यांनी मंगळवारी कार्यभार स्वीकारला. राज भवनात झालेल्या कार्यक्रमात नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी शर्मा यांना पद व गोपनियतेची शपथ दिली.

यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती, मदनलाल तसेच वरिष्ठ न्यायमूर्ती आणि वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. सतीशचंद्र शर्मा हे याआधी तेलंगण उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती होते. मागील काही महिन्यांपासून दिल्ली उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तीपद रिकामेच होते. या पदाची हंगामी जबाबदारी न्यायमूर्ती बिपीन सांघी यांच्याकडे होती. दरम्यान, सांघी यांची उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली आहे.

हे वाचलंत का?

Exit mobile version