‘शूटर दादी’ चंद्रो तोमर यांचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन  | पुढारी

'शूटर दादी' चंद्रो तोमर यांचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन 

पुढारी ऑनलाईन डेस्क

देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. सामान्यांपासून अगदी दिग्गजांपर्यंत अनेक जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामध्ये आणखी एक दुखद बातमी अशी की, प्रसिद्ध निशाणेबाज चंद्रो तोमर यांचं निधन झालं आहे. त्यांना काही दिवसांपूर्वीच कोरोना झालेला होता, उपचार सुरू असताना ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे चंद्रो तोमर यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. 

वाचा ः कोरोना पार्श्वभूमीवर मेडिक्लेमसाठी कोणते पर्याय आहेत?

चंद्रो तोमर यांचे वय ८९ वर्षे होते. २६ एप्रिल रोजी त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले होते. सुरुवातीला बागपतच्या आनंद रुग्णालयात दाखल केलेल्या चंद्रो तोमर यांना नंतर उपचारासाठी मेरठ मेडिकल काॅलेजमध्ये हलविण्यात आले होते. २६ एप्रिल रोजी सोशल मीडियावरून त्या कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले होते. 

वाचा ः कोव्हिडनंतर हृदयविकाराची समस्या?

शूटर दादी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या चंद्रो तोमर यांचा जन्म मुजफ्फनगरमध्ये झाला होता. वयाच्या साठाव्या वर्षी त्यांनी निषाणेबाज अशी ओळख मिळवली. त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत अनेक यश मिळवलं होतं. त्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली होती. त्यांच्या जीवनावर हिंदी चित्रपटविश्वात ‘सांड की ऑंख’ असा सिनेमाही तयार करण्यात आला होता. चंद्रो तोमर यांचा तत्कालीन राष्ट्रपतींकडून ‘स्त्री शक्ती सन्मान’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 

Back to top button