गुजरातमधील कोविड सेंटरमध्ये अग्नितांडव; १८ जणांचा होरपळून मृत्यू  | पुढारी

गुजरातमधील कोविड सेंटरमध्ये अग्नितांडव; १८ जणांचा होरपळून मृत्यू 

भरुच (गुजरात) : पुढारी ऑनलाईन

गुजरातमधील भरुच येथील कोविड रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत १८ जणांचा होरपळून मृत्यू लागली आहे. हा अपघात भरूचमधील पटेल वेलफेअर रुग्णालयात मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या. येथील पटेल वेलफेअर रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. 

भरुचचे एसपी राजेंद्र सिंह चुडासमा म्हणाले की, शॉर्ट सर्किटमुळे आयसीयूला आग लागली. नंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या अग्नी तांडवात १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आगीनंतर लगेचच येथे दखल झालेल्या रूग्णांना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. आग इतकी तीव्र होती की बर्‍याच रुग्ण आगीत अडकले. 

Back to top button