कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी मोदी सरकारसाठी मोठी घोषणा | पुढारी

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी मोदी सरकारसाठी मोठी घोषणा

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : कोरोना महामारीमध्ये पालक गमावलेल्या मुलांसाठी केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. अशा मुलांना मोफत शिक्षण आणि उपचाराची सुविधा मिळेल. जेव्हा ते १८ वर्षांचे होतील तेव्हा मासिक वेतन (स्टायफंड) मिळेल आणि २३ वर्षानंतर दहा लाख रुपयांची आर्थिक मदत मिळेल. मोदी सरकारची सात वर्षे पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनामुळे अनाथ मुलांसाठी कल्याणकारी योजनांची घोषणा केली.

अधिक वाचा : आयएमएकडून रामदेब बाबांना ओपन चॅलेंज!

ही मदत ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेंतर्गत केली जाईल. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनामुळे अनाथ मुलांबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यात पीएम केअर फंडमधून अशा मुलांचे भविष्य घडविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिक वाचा : पुलवामा हल्ल्यातील शहीद मेजर विभूतींच्या पत्नी निकिता झाल्या लेफ्टनंट

पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) याबाबत निवेदन जारी केले. अशा मुलांच्या नावे मुदत ठेव योजना सुरू केली जाईल, असे त्यात म्हटले आहे. पीएम केअर फंडच्या एका विशेष योजनेत या योजनेचे योगदान दिले जाईल जेणेकरून वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर प्रत्येकासाठी १० लाख रुपयांचा निधी तयार केला जाऊ शकेल.

Back to top button