धुळ्यात आज गृहमंत्री अमित शहा यांची सभा | पुढारी

धुळ्यात आज गृहमंत्री अमित शहा यांची सभा

धुळे : पुढारी वृत्तसेवा
शहरात सोमवारी (दि.१३) रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची तोफ धडाडणार आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या घटक पक्षांसह प्रशासनानेदेखील जय्यत तयारी केली आहे.

धुळे लोकसभेत पक्षाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ दुपारी १ वाजता ही सभा होत असून, त्यासाठी मालेगाव रोड लगतच्या गोशाळा मैदान सज्ज करण्यात आले आहे. याच मैदानाच्या एका भागात हेलिपॅड तयार केले असून, त्या जवळच सभेसाठी मोठा पेंडाल लावण्यात आला आहे. सभेच्या माध्यमातून मंत्री अमित शहा हे महाविकास आघाडीचा नेमका कसा समाचार घेतात, याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. यापूर्वी धुळे लोकसभेसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभा झाल्या आहेत. त्यांनी भाजपवर टीका केली आहे. या टीकेला नेमके मंत्री शहा हे कसे उत्तर देतात, याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

Back to top button