दिलासा : सलग तिसर्‍या दिवशी सर्वात कमी रुग्‍णांची नोंद  | पुढारी

दिलासा : सलग तिसर्‍या दिवशी सर्वात कमी रुग्‍णांची नोंद 

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन: संपूर्ण देशातील कोरोना रुग्‍णाच्‍या वाढत्‍या संख्‍येला सलग तिसर्‍या दिवशी ब्रेक बसला आहे. मागील २४ तासांमध्‍ये १ लाख ६५ हजार, ५५३ नवे रुग्‍ण आढळले. तर २ लाख ७६ हजार ३०९ रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले. ३ हजार ४६० रुग्‍णांचा मृत्‍यू झाला, अशी माहिती आरोग्‍य विभागाने दिली.

अधिक वाचा : अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचे कोरोनाने निधन 

 मे महिन्‍याच्‍या प्रारंभी कोरोनाच्‍या दुसर्‍या लाटेचा प्रकोप अनेक राज्‍यांनी अनुभवला. मात्र मागील काही दिवसांमध्‍ये रुग्‍णसंख्‍येत घट दिसून येत आहे. मागील २४ तासांमध्‍ये १ लाख ६५ हजार ५५३ नवे रुग्‍ण आढळले. ही आकडेवारी मागील ४६ दिवसांमधील सर्वात कमी आहे.

अधिक वाचा : दोन लसींमधील अंतर नेमके किती असावे? 

 देशभरात आतापर्यंत २ कोटी ७८ लाख ९४ हजार ८०० जण कोरोनाबाधित झाले तर २ कोटी ५४ लाख ५४ हजार ४१० जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत ३ लाख २५ हजार ९७२ रुग्‍णांचा बळी गेला आहे. सध्‍या २१ लाख १४ हजार ५०८ रुग्‍णांवर उपचार सुरु आहेत, असेही आरोग्‍य मंत्रालयाच्‍या सूत्रांनी सांगितले. 

अधिक वाचा : चिंधीगिरी! ‘या’ अभिनेत्रीने कोविड योद्धा असल्याचे फेक ओळखपत्र दाखवून घेतली लस

 

Back to top button