नोव्होवॅक्सच्या पहिल्या बॅचचे उत्पादन सुरू | पुढारी

नोव्होवॅक्सच्या पहिल्या बॅचचे उत्पादन सुरू

पुणे : पुढारी वृत्तसेवा

 सीरम इन्स्टिट्यूट आणि नोव्होवॅक्स या दोन कंपन्यांच्या सहकार्याने लहान मुलांसाठी नोव्होवॅक्स ही कोविड प्रतिबंधक लस विकसित करण्यात येत आहे. या लसीच्या पहिल्या बॅचचे उत्पादन सीरममध्ये सुरू झाले असल्याची माहिती सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी शुक्रवारी टि्वटरद्वारे दिली.

   नोव्होवॅक्स ही लस 18 वर्षांच्या आतील  मुलांसाठी तयार करण्यात आली आहे. तिचे उत्पादन सध्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये सुरू आहे. या लसीची तिसर्‍या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. आतापर्यंत केलेल्या चाचणीत ही लस 90 टक्के परिणामकारक आढळून आलेली आहे. तसेच सध्या बदललेल्या विषाणूवरही ती प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. सप्टेंबरअखेर याचे 20 कोटी डोस तयार होतील अशी शक्यता पूनावाला यांनी वर्तवली आहे. 

आदर पूनावाला यांनी केलेल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की, नोव्होवॅक्सची पहिली बॅच सीरममध्ये उत्पादित केली जात आहे. ही लस भावी पिढीसाठी खूप परिणामकारक आहे. तिच्या चाचण्या अद्याप सुरू असून पुण्यातील सीरमच्या टीमने चांगले काम केले आहे.

Back to top button