गायींच्या नावावर प्रत्येकी लाखाची FD! जाणून घ्या ‘त्या’ गोठ्यातील गायी कशा बनल्या लखपती? | पुढारी

गायींच्या नावावर प्रत्येकी लाखाची FD! जाणून घ्या ‘त्या’ गोठ्यातील गायी कशा बनल्या लखपती?

पुढारी ऑनलाईन डेस्क : राधा, सीता, गीता आणि मोहना… ही नावे गायींची आहेत ज्या लखपती आहेत. हे विचित्र वाटले, पण हे खरं आहे. राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील भोडकी गावातील जामवे ज्योती गोशाळेत सुमारे 1000 गायी आहेत, त्यापैकी 31 दुभत्या गाईंच्या नावावर प्रत्येकी एक लाख रुपये बँकांमध्ये मुदत ठेवी (FD) आहेत. 2015 मध्ये काही एकर जागेवर ही गोशाळा सुरू झाली. आता ग्रामस्थांच्या मदतीने तिचा आवाका वाढला आहे. परस्पर सहकार्याने सुरू झालेल्या गोशाळेला गावातील अनेक लोकांनी जमिनी दान केल्या आहेत. (cows fd)

गोशाळेची देखभाल करणारे गावचे सरपंच शिवराम गोदरा म्हणतात, ‘गुरांमुळे पिकांचे नुकसान होत असल्याचे पाहून गोशाळा सुरू करण्याची कल्पना आली. एक लाख रुपयांची एफडी गायींच्या संगोपनासाठी उपयुक्त ठरेल. 31 एफडींपैकी अर्ध्या स्थानिक लोकांनी आणि उर्वरित सामाजिक कार्यकर्त्यांनी उघडल्या आहेत. एफडी व्याज गायींसाठी वापरले जाते. हे व्याज सुमारे 6,000 रुपये वार्षिक असले तरी ते मदत म्हणून वापरले जाते. जेव्हा एखादी गाय गाभण असते, तेव्हा स्थानिक लोकांकडे एफडीसाठी संपर्क साधला जातो आणि मग एक गोभक्त सामाजिक कार्यकर्ता गाय दत्तक घेतो, असे त्यांनी सांगितले. (cows fd)

गावातील सरकारी शाळेतील शिक्षक आणि शेतकऱ्यांनीही आईच्या नावाने गायी दत्तक घेतल्याचे गोदरा यांनी सांगितले. राधा, राधिका, सीता, गीता इत्यादी या गायींची नावे त्यांच्या नावावर ठेवण्यात आली आहेत. ते म्हणाले की लोकं मदत आणि देणगी देण्यास तयार आहेत. सरकारी अनुदानास विलंब झाल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती असल्यास एफडीवर कर्ज घेतले जाते. या गोशाळा समितीमध्ये 300 सदस्य असून ते दरमहा ठराविक रक्कम देतात. गोशाळेला दरमहा एकूण अडीच लाख रुपयांची देणगी मिळते. हा गोठा चालवण्यासाठी दरमहा आठ लाख रुपये लागतात. गोठ्यातील सर्व जनावरांचे टॅगिंगही करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. (cows fd)

गोशाळेसाठी परस्पर सहकार्याने कूपनलिकाही बसविण्यात आल्या आहेत. सध्या साडेसहा एकर जमिनीत चा-याची लागवड केली आहे. तसेच गोशाळेच्या आवारात सेंद्रिय खत निर्मितीचा प्लांटही उभारण्यात आला आहे. यामध्ये गांडुळ खत तयार केले जाते. रासायनिक खतांपेक्षा ते पिकांसाठी अधिक फायदेशीर आहे. (cows fd)

Back to top button