OBC reservation : ओबीसी आरक्षणावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर | पुढारी

OBC reservation : ओबीसी आरक्षणावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी)  (OBC reservation) राजकीय आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयात आज  पुन्हा एकदा सुनावणी लांबवणीवर पडली. गुरूवारी यासंबंधी सुनावणी होण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी आणखी एक याचिका विकास गवळी यांच्या वतीने दाखल करण्यात आल्याची महिती समोर आली आहे.

मागासवर्ग आयोगाच्या अंतरिम अहवालानूसार आरक्षण लागू करण्याची परवानगी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे मागितली आहे. अशात न्यायालयाच्या निकालावर ओबीसींचे राजकीय आरक्षण अवलंबून आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष सुनावणीकडे लागले आहे. पंरतु, दोन वेळा सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने १७ डिसेंबर रोजी ओबीसी आरक्षणासाठीची त्रिसूत्री पार पाडल्याशिवाय राजकीय आरक्षण लागू करता येणार नाही, असा निर्वाळा दिला होता. महाराष्ट्रातल्या १०५ नगर पंचायतींच्या निवडणुका त्यामुळे दोन टप्प्यांत पार पाडण्याची वेळ आली होती. आयोगाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ओबीसीसाठी राखीव जागा या खुल्या प्रवर्गातल्या म्हणूनच गृहीत धरल्या जाव्यात, असा आदेश ही न्यायालयाने दिला होता.

हेही वाचलंत का ?

पहा व्हिडिओ 

पिंपरीतील मेट्रोची झलक

Back to top button