पुणे : पत्नीच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या | पुढारी

पुणे : पत्नीच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या

यवत : पुढारी वृत्तसेवा

पत्नी आणि सासरच्या लोकांकेून होणाऱ्या त्रासाला कंटाळून केडगाव (ता. दौंड) येथील प्रशांत शेळके या युवकाने आत्महत्या केली. याबाबत प्रशांत यांचे वडील संपत विठ्ठल शेळके (रा. केडगाव, देशमुख मळा ता. दौंड) यांनी फिर्यादी दिली आहे.

#OperationGanga :गेल्या २४ तासात १३०० भारतीयांची युक्रेनमधून सूटका

या फिर्यादीवरून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात मृताची पत्नी भाग्यश्री दत्तात्रय पिसे, सासू स्वाती दत्तात्रय पिसे, सासरे दत्तात्रय विठ्ठल पिसे (सर्व रा. केडगाव स्टेशन, ता. दौंड, पुणे) व प्रदीप भिवा नेवसे (रा. बोरिपारधी, ता. दौंड) यांचा समावेश आहे.

अधिक माहितीनुसार, एका महिलेने केडगाव देशमुख मळा येथील युवक प्रशांत संपत शेळके यांची फसवणूक करून स्वतःचे पहिले लग्न झाले असतानाही प्रशांत याच्याशी दुसरे लग्न केले. तसेच मानसिक व आर्थिक त्रास दिल्याने प्रशांत शेळके याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे करत आहेत.

हेही वाचा

Crude Oil Price : कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, भारतात उडणार महागाईचा भडका?

Bull Riding: खवळलेल्या बैलापासून जिवाची पर्वा न करता बापाने वाचवला मुलाचा जीव

व्लादीमीर पुतीन यांची तब्बल ७२९ कोटी रुपयांची आलिशान नौका हॅकर्सच्या निशाण्यावर !

Back to top button