कंदाकुर्ती : श्रीराम मंदिरातून चोरीला गेलेल्या मूर्ती पार्सलमधून आल्या परत | पुढारी

कंदाकुर्ती : श्रीराम मंदिरातून चोरीला गेलेल्या मूर्ती पार्सलमधून आल्या परत

धर्माबाद, पुढारी वृत्तसेवा : तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध असलेल्या कंदाकुर्ती येथील स्वयंभू श्रीराम मंदिरातून चोरीला गेलेल्या मुर्ती चोराने पार्सलमधून परत पाठवलेल्या आहेत. सर्व मूर्ती आणि दागिने सुरक्षित राहिले आहेत. असा प्रसंग प्रथमच घडला असल्याने या घटनेबद्दल कुतूहल निर्माण झाले असून प्रभू श्रीरामाची लीला अपारंपार असल्याचे यातून सिद्ध झाले असल्याचे भाविक बोलून दाखवत आहेत.

कंदकुर्ती येथील डाॅ. केशवराव हेडगेवार यांच्या जन्मभुमीसमोर 275 वर्षापूर्वीचे  स्वयंभू श्रीराम मंदीर आहे. 8 जानेवारीच्या मध्यरात्री मंदिरात चोरी झाली होती. या चोरीमध्ये प्राचीन काळातील मुर्ती, सोन्याचे काॅरीट, मुकुटे व काही दागिने चांदीचे दागिने असा ऐवज चोरट्यांनी चोरला होता. या प्रकरणाची ब्राम्हण संघटनेनी सीबीआयकडून चौकशी करावी अशी केंद्र शासनाला मागणी केली होती.

या चोरीचा तपासण लावण्यासाठी निजामाबादचे पोलीस सहाय्यक आयुक्त एन. रामराव आणि पोलीस अधीक्षक बी.  रविंद्र यांनी कसून तपास चालविला होता. तसेच चोरट्यांच्या तपासासाठी वेगवेगळी पथक तयार करण्यात आली होती. चोरट्यांनी दि.30 जानेवारी 2022 (म्हणजे 23 व्या दिवशी) रोजी मंदिराचे पुजारी बापु महाराज यांच्या घरी एका गाडीतून दोन पार्सल आले. त्यामध्ये चार बाॅक्स होते. त्यामध्ये चोरीला गेलेल्या मुर्ती व सोन्याचे व चांदीचे दागिने होते हे पाहताच पुजारी बापू महाराज यांनी पोलिसांकडे धाव घेऊन संपूर्ण परिस्थिती सांगितले. (कंदाकुर्ती)

तेलंगणा राज्यामधील पोलीस त्या गाडीची आणि पार्सल पाठवण्यात आलेल्या चोराची चौकशी करत आहेत. चोरांनी पळविलेल्या मुर्ती आणि सोन्याचे चांदीचे दागिने पहिल्यांदाच चोरांनी परत केले. त्यामुळे भाविकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. चोरट्यांनी चोरलेला ऐवज प्रथमच परत करण्याची घटना घडली असून प्रभू श्रीरामाची लीला अपारंपार असल्याचे भाविक बोलून दाखवत आहेत.

चोरट्यांनी वापस केलेल्या पार्सलमधील मूर्ती तपासणी करण्यात आले तसेच ते पार्सल आणण्यात आलेल्या ऑटोचालकाची चौकशी सुरु आहे. मुख्य चोरटे कोण याचा तपास लवकरच लावण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींना दिली आहे.

Back to top button