बेळगाव : सौंदत्ती रेणुका मंदिरासह नऊ प्रमुख देवस्थाने दर्शनासाठी खुली | पुढारी

बेळगाव : सौंदत्ती रेणुका मंदिरासह नऊ प्रमुख देवस्थाने दर्शनासाठी खुली

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा 

कोरोना आणि ओमायक्रॉन संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सौंदत्ती रेणुका देवी मंदिरासह नऊ मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी बंद केली होती. ही मंदिर आता भाविकांच्या दर्शनासाठी पुन्हा खुली करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आज (सोमवार) दिले आहेत. ही मंदिरे 16 डिसेंबर पासून बंद करण्यात आली होती.

कोरोनाचा संसर्ग आता कमी होत असल्याने जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी लाखो भाविकांचे श्रध्दास्‍थान असलेले श्री रेणूका देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुली करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच जिल्‍ह्यातील आणखी नऊ प्रमुख देवस्थाने भाविकांना दर्शनासाठी खुली केली आहेत.

यामध्ये रेणुका यल्लम्मा देवस्थान सौंदत्ती, जोगणभावी सत्तेम्मा देवस्थान, सौंदत्ती , वीरभद्रेश्वर देवस्थान गुडची, रामदुर्ग, मायाक्का देवस्थान, चिंचली, ता. रायबाग, दत्त देवस्थान, पंतबाळेकुंद्री , होळेम्मा देवस्थान बडकुंद्री, हुक्केरी, श्री खंडोबा देवस्थान मंगसुळी, ता. कागवाड, बसवेश्वर देवस्थान खिळेगाव, ता. अथणी, रेणुका देवस्थान कोकटनूर, ता. अथणी यांचा समावेश आहे. ही मंदिरे आता मंगळवारी 1 फेब्रुवारीपासून भावीकांसाठी उघडणार आहेत.

Back to top button