Ramtek Lok Sabha : रामटेकसाठी काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज दाखल | पुढारी

Ramtek Lok Sabha : रामटेकसाठी काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ता, शेतकरी, जनतेची लेक रणांगणात उतरलेली आहे. त्यांच्या विश्वासावर खरी उतरण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, जनतेची ताकद मला बळ देईल असा विश्वास रामटेकच्या काँग्रेस मविआ उमेदवार रश्मी बर्वे यांनी म्हटले आहे. ( Ramtek Lok Sabha )

संबंधित बातम्या 

मविआत शिवसेनेचे सुरेश साखरे यांच्या बंडखोरीविषयी छेडले असता मला त्याविषयी माहित नाही. मविआचे सर्व नेते, माझी जनता माझ्यासोबत आहे. जोपर्यंत त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत कोणतीही शक्ती मला पराभूत करू शकत नाही. असा दावा त्यांनी केला. जात प्रमाणपत्र संदर्भात वारंवार अडचणी, प्रश्न निर्माण केले जात असले तरी काल आक्षेप याचिका खारीज झाली. न्यायालयावर माझा विश्वास आहे असे सांगितले.

जनतेची ताकदच मला बळ देईल, महाविकास आघाडीचे सर्व नेते हे माझ्या रॅलीत उपस्थित होते असा दावा केला. महाविकास आघाडीने उमेदवारी दिल्याने गोरगरिबांचा आवाज म्हणून मी निवडणुकीत व संसदेत जाणार आहे असेही रश्मी बर्वे यांनी एका प्रश्नाचे उत्तरात सांगितले. ( Ramtek Lok Sabha )

Back to top button