नागपुरात काँग्रेस नेते सुनील केदार गटाला धक्का; मनोहर कुंभारे भाजपात | पुढारी

नागपुरात काँग्रेस नेते सुनील केदार गटाला धक्का; मनोहर कुंभारे भाजपात

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा एकीकडे नागपूर लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी तर रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांचे नामांकन दाखल करण्याची लगबग नागपुरात सुरू असतानाच माजी मंत्री, काँग्रेस नेते सुनील केदार यांना मोठा धक्का भाजपने दिला आहे. त्यांचे निकटवर्तीय माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी गडकरी यांच्या निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. यावेळी भाजपचे माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी, रमेश मानकर, माजी जिल्हाध्यक्ष डॉ राजीव पोतदार प्रामुख्याने उपस्थित होते.

विशेष म्हणजे आजच रामटेकच्या काँग्रेसच्या उमेदवार गडचिरोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे नामांकन दाखल करणार असताना केदार गटाला भाजपने हा धक्का दिला आहे. भविष्यात त्यांना सावनेर विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवारी देऊ शकते. काँग्रेसने गडचिरोली लोकसभा मतदारसंघात तिकीट नाकारताच महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी मंगळवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपुरात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आज काँग्रेसला हा धक्का बसला आहे.

हेही वाचा :

Back to top button